औरंगाबाद : औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलगी रिक्षात एकटी असल्याचे फायदा उचलून रिक्षा चालकाने अश्लील प्रश्न विचारण्यास आणि अश्लील चाळे करण्यात सुरुवात केल्यामुळे घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून थेट उडी मारलीय. या घटनेत मुलगी रस्त्यावर कोसळली आणि गंभीर जखमी झाली. यानंतर रिक्षा चालकाने मुलीची मदत करण्याऐवजी ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Video) कैद झालीय.
या प्रकरणात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणारा रिक्षाचालक सय्यद अकबर सय्यद हमीद (वय ३९, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) याला क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतले.
https://twitter.com/ssidsawant/status/1592709491799523328
याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लास करणारी एक अल्पवयीन (१७ वर्षीय) मुलगी गोपाल टी ते शिवाजी हायस्कूल येथे जाण्यासाठी रिक्षात बसली. रिक्षात ती एकटी असल्याची संधी साधून रिक्षाचालकाने तिच्याशी अश्लील संवाद सुरू केला आणि रिक्षा वेगात नेण्यास सुरुवात केली. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखून रिक्षातून बाहेर उडी घेतली.
धावत्या रिक्षातून उडी टाकल्यानं मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागला. ज्या वेळी मुलीने रिक्षातून उडी टाकली, तेव्हा रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. मागून येणाऱ्या वाहनांना आणि दुचाकीखाली ही मुलगी येण्याची भीती होती. मात्र मागील वाहनांनी प्रसंगावधान राखल्यानं थोडक्यात मोठा अनर्थ टळला.