उत्तर प्रदेश : महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच अत्याचाराची हादरवून सोडणारी आणि संतापजनक घटना समोर आलीय. 25 वर्षीय नराधमाने अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उत्तर प्रदेशच्या इटा इथं घडली. याप्रकरणी नराधम तरुणाला अटक करण्यात आली असून या घटनेप्रकरणी अधिक तपास केला जातोय.
कळलं कसं?
दीड वर्षीय चिमुकलीच्या मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. इटा येथील मरहरा पोलीस स्थानकात दीड वर्षांच्या चिमुकीलवर 25 वर्षांच्या तरुणाच्या बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला होता.
या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत तातडीनं तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, दीड वर्षांच्या चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत आढळून आली असल्याचीही माहिती समोर आलीय.
हे सुद्धा वाचा..
१ डिसेंबर पासून ‘या’ विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांकरीता मोफत प्रशिक्षण ; आजच नावं नोंदणी करा…
12वी पाससाठी महाराष्ट्र पोलीस खात्यात बंपर भरती, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु
मग मानहानीचा दावा कशासाठी? 50 खोक्यावरून एकनाथ खडसेंची टोलेबाजी
..आणि कुटुंबीय हादरले
गंभीररीत्या जखमी झालेली आणि रक्ताच्या थारोळ्यात जिवाच्या आकांतानं ही चिमुरडी रडत होती. दीड वर्षीय पीडित चिमुरडीचे कुटुंबीय जेव्हा घरी आले, तेव्हा ते मुलीची अवस्था पाहून हादरुनच गेले.