ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवशी व्हाट्सअपची मेसेंजर सेवा आज २५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी साडे बारा वाजेपासून ठप्प पडली आहे. अनेक ठिकाणी युजर्सना मेसेज पाठवण्यात अडचण जाणवत आहे मात्र मेटा कंपनीकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
आज दुपारी व्हॉटस अॅपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. सुरुवातीला इंटरनेटची समस्या असू शकते असे अनेकांना वाटत होते. मात्र, इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्स अॅपवरून मेसेज जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले व लक्षात आले की व्हॉट्स अॅप सेवा ठप्प झाली आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. व्हाट्सअपची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही.दरम्यान व्हाट्सअप सेवा सुरु होण्याकडे सर्व युजर्सचे लक्ष लागून आहे.