उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा पुत्र आहे.
- काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत असताना औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव केले.
- आता त्यांना धनुष्यबाणा पाहिजे, बाळासाहेब पाहिजे, आपली शिवसेना पाहिजे.
- आपली पंरपरा असलेले हे मैदान त्यांना मिळू द्यायचे नव्हते, मात्र, न्यायालयामुळे ते मिळाले.
- आता काही तोतये आपली शिवसेना पळवायला आले आहेत, तुम्ही पळवायला देणार आहात का
- इतिहासात तोतयाचे बंड आहे.
- ईडी कार्यालयात गेल्यावर त्यांच्या अंगात हिंदुत्वाच्या घागरी फुंकायला लागतात.
- बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना का सोडण्यात आले, त्यांचा सत्कार करण्यात आला. हे काय सुरू आहे.
- अंकिता भंडारी यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई का होत नाही, तिच्या मातेचा आक्रोश ऐकायला येत नाही का
- तुमच्या हातात जपमाळ असेल आणि समोर स्टेनगन घेतलेला दहशतवादी असेल, तर तुमच्याही हातात स्टेनगन असायला हवी
- या देशावर प्रेम करणारा, मुसलमान असला तरी तो आपला आहे.
- अमित शहा आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत हेच कळत नाही
- जर माझ्या शिवसैनिकांवर अन्याय कराल तर कदापि सहन करणार नाही तुमचा तो कायदा तुमच्या मांडीवर कुरवाळत बसा
- राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे दत्तात्रय होसबाळे यांनी संघाला आणि भाजपला आरसा दाखवण्याचे काम केले आहे, त्यांचे अभिनंदन
- हिंदुत्व करत तुम्ही गाईवर बोलतात, महागाईवर बोला
- पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला न बोलता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार
- पाकिस्तानचे माजी पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जाणारे तुमचे नेते, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार
- शिवसेना कशी पुढे न्यायची, हिंदुत्व कसे सांभाळायचे, ते आम्हाला शिकवू नका
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आपल्यात नाहीत, ते त्यांच्या नावाने मते मागत आहेत.
- स्वतःच्या बापाच्या नावाने मते मागण्याची ताकद नाही. बाप चोरणारी एवलाद आहे ती..
- आपण छत्रपती शिवराय आणि आईवडिलांच्या साक्षीने सांगतो, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरले होते.
- अमित शहा बोलले असे काही ठरले नव्हते.
- जर आपण हिंदुत्व सोडले असेल तर तुम्हीच सांगा
- भाजपने पाठीत वार केला म्हणून आपण महाविकास आघाडी केली होती.
- आपल्यावर शस्त्रक्रिया झाली त्यानंतर आपले शरीर निश्चल झाले होते, त्यावेळी कटाप्पा कट करत होते.
- आता 50 खोक्यांचा खोकासूर आहे.
- या वेळेचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावणही बदलत आहे.