जळगाव, प्रतिनिधी) राज्यातील ४४ आयएएस अधिकारी यांच्या बदलीचा शासन आदेश रात्री उशिरा निघाले असून यात जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित यांची देखील नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. अभिजित राऊत आज शुक्रवार, ३० सप्टेंबर रोजी नांदेडचे पदभार स्वीकारणार आहेत. तर त्यांच्या जागी आता जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून अमन मित्तल जिल्हाधिकारी म्हणून असणार आहेत.अमन मित्तल हे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त पदावर काम पाहत होते ते आता जळगांवचे नूतन जिल्हाधिकारी असतील ते लवकरच पदभार स्वीकरतील.
राज्यातील ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या
१) मनीषा म्हैसकर
प्रधान सचिव, राजशिष्टाचार व मराठी भाषा (अति.) अति. आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे
२) लीना बनसोड सीईओ, नाशिक जि.प.
अति. आयुक्त आदिवासी विकास,ठाणे
३) विवेक जॉन्सन
सीईओ, चंद्रपूर जि. प. जिल्हाधिकारी, नांदेड
४) अभिजित राऊत
जिल्हाधिकारी, नांदेड
५) डॉ. रामास्वामी एन. संचालक, एनएचएम
आयुक्त, कौशल्य विकास
६) हर्षदीप कांबळे
प्रधान सचिव उद्योग
७) जयश्री भोज
महासंचालक, माहिती व जनसंपर्क व महाआयटी
कॉर्पोरेशनच्या एमडीपदाचा अति. कार्यभार प्रकल्प संचालक, कृषी संजीवनी प्रकल्प
८) परिमल सिंग
प्रकल्प संचालक, कृषी संजीवनी प्रकल्प
९) ए. आर. काळे
आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन
१०) राजेश नार्वेकर
महापालिका आयुक्त, नवी मुंबई
११) अभिजित बांगर
आयुक्त, ठाणे महापालिका
१२) डॉ. विपीन शर्मा
सीईओ, एमआयडीसी
१३) नीलेश गटणे
सीईओ, एसआरए पुणे
१४) सौरभ विजय
सचिव, सांस्कृतिक कार्य व पर्यटन
१५) मिलिंद बोरीकर
सीईओ, मुंबई म्हाडा
१६) अविनाश ढाकणे
एमडी, चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास
१७ संजय खंदारे
प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य
१८) डॉ. अनबलगन
अध्यक्ष व एमडी, महानिर्मिती
१९) दीपक कपूर
अति. मुख्य सचिव, जलसंपदा
२०) वल्सा नायर
प्रधान सचिव, गृहनिर्माण
२१) मिलिंद म्हैसकर
प्रधान सचिव, नागरी उड्डयण व सामान्य प्रशासन,
राज्य उत्पादनचा अतिरिक्त कार्यभार
२२) प्रवीण दराडे
पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या
सदस्य सचिवांचा अतिरिक्त कार्यभार आयुक्त, एफडब्ल्यू व संचालक, नॅशनल हेल्थ मिशन
२३) तुकाराम मुंढे
आयुक्त एफ डब्ल्यू व संचालक, नेशनल हेल्थ मिशन
२४) अनुपकुमार यादव
सचिव, अल्पसंख्याक विकास
२५) प्रदीपकुमार व्यास
अतिरिक्त मुख्य सचिव, आदिवासी विकास
२६) डॉ. अश्विनी जोशी
सचिव, वैद्यकीय शिक्षण
२७) दीपेंद्रसिंह कुशवाड
विकास आयुक्त, उद्योग
२८) अशोक शिंगारे
जिल्हाधिकारी ठाणे
२९) श्रद्धा जोशी
एमडी, एमटीडीसी
३०) मंजू जिंदाल
सीईओ, जि. प. ठाणे
३१)सचिन ऑबासे
जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
३२) अमन मित्तल
जिल्हाधिकारी, जळगाव
33) राजेश पाटील
संचालक, सैनिक कल्याण, पुणे
३४) अशिमा मित्तल
सीईओ, जिल्हा परिषद, नाशिक
३५) कीर्ती किरण पुजार
सीईओ, जिल्हापरिषद, रत्नागिरी
३६) रोहन घुगे
सीईओ, जिल्हा परिषद, वर्धा
३७) विकास मीना
सीईओ, जिल्हा परिषद, जालना
३८) वर्षा मीना
सीईओ, जिल्हा परिषद, जालना
३९) के. व्ही. जाधव
कार्यकारी संचालक, एसटी महामंडळ, मुंबई
४०) कौस्तुभ दिवेगावकर
प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी
४१) राजेंद्र निंबाळकर
कार्यकारी संचालक, महा. लघुउद्योग वि. महामंडळ
४२) विवेक भीमनवार
आयुक्त, परिवहन
४३) डॉ. भगवंतराव पाटील
आयुक्त, महापालिका नांदेड-वाघाळा
४४) देवेंद्र सिंग
जिल्हाधिकारी, रत्नागिरी