सोलापूर, (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जनावरांचा लंपी त्वचारोग मोठ्या प्रमाणात पसरला आहे जनावरे हे शेतकऱ्यांचे किंमती धन आहे जनावरे दगावली तर शेतकरी कोलमडून पडणार आहे, त्यामुळे सरकारने तातडीने सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र जनावरांचे दवाखाने मोठ्या प्रमाणावर सर्वत्र सुरू करावेत आणि लसीकरण चालु करावे अशी मागणी रावण साम्राज्य सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आणि सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस सुयश गायकवाड यांनी जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या कडे केली आहे.
नोकरीच्या बातम्या वाचा….क्लिक करा…
जळगाव,भुसावळ येथे मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी पदभरती ; परीक्षा नाही, फक्त मुलाखत घेऊन मिळणार नोकरी
धुळ्यात 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. इतका पगार मिळेल, कसा अर्ज कराल?
विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती; 10वी पासही अर्ज करू शकतात, 92000 पगार मिळेल
बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रमध्ये 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी..
BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये मोठी भरती ; 1 लाखापर्यंतचा पगार मिळेल
नोकरीची मोठी संधी… मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती
राज्यात ज्या भागांमध्ये जनावरांची लंपी चर्मरोगाची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे त्याठिकाणी कोरंटाइन सेंटर सुरू करावेत अशी ही मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे.जनावरे हे शेतकऱ्यांचे सोने आहे त्यामुळे हे सोने वाचविण्यासाठी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे हे संकट महाराष्ट्र सरकारने तातडीने दूर करण्यासाठी सर्वत्र जनावरांचे दवाखाने सुरू करावेत आणि जनावरांच्या लसीकरणाची मोहीम हाती घ्यावी असे या निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
उत्तर भारतात लंपी च्या आजारामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे दगावले आहेत देशभरात आतापर्यंत लंपी च्या या रोगामुळे 70 हजार जनावरांचा मृत्यू झाले आहेत, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये लंपीचा प्रसार मोठ्या वेगाने होत आहे, सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी व रस्त्यावरत मृत जनावरांचे खच पडले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे, याचा अंदाज ओळखून सोलापूर जिल्ह्यात तातडीने लसीकरण सुरू करावेत आणि दवाखाना ची संख्या वाढवावी अशी ही मागणी सुयश गायकवाड यांनी केली आहे.