जळगाव – खान्देशात प्रथमच छंद शिबीर घेण्यात येत असून पोस्टाची तिकिटे याविषयी माहिती दिली जाणार आहे. याकरिता नावनोंदणी करण्यात आली असून शिबीर १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान घेतले जाणार आहे.
जळगावच्या फिलेटली ग्रुपच्या वतीने आयोजन असून शिबिरासाठी जागा मर्यादित आहे. ३० जणांनाच प्रवेश असून त्याकरिता नोंदणी आवश्यक आहे. हे शिबीर सकाळी 9 ते 12 या वेळेत होणार असून रामानंद नगर भागातील विवेकानंद नगर येथील कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिर येथे हे शिबीर होईल. यात पोस्टाच्या तिकिटांचा इतिहास, ती कशी जतन करावी, तिकिटांचे आराखडे यासह पोस्ट तिकिटांसाठी असणा-या शिष्यवृत्ती व स्पर्धांची माहिती तज्ज्ञ देणार आहेत. भारतीय डाक विभागाचे जिल्हा डाक अधिकारी राजेश सोनाळकर यांचेसह नाशिक, पुणे येथील तज्ज्ञ माहिती देणार आहेत.
डाक खात्याचे शिबिरासाठी सहकार्य मिळत असून अधिक माहितीसाठी कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिर येथे शालेय वेळेत किवा भूषण ब-हाटे (७३८७८१८२४८), सिद्धेश कोटेचा (८८५५०००९३७) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.














