मुंबई : गेल्या काही काळात गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहे. सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण निर्माण होते. चुलीवर जेवण बनविण्यासाठी लाकडांची गरज भासते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केली जाते व जंगल तोडीमुळे पर्जन्यमानावर याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम परिणाम होतो. सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने निर्धूर चुल वाटप योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील पात्र कुटुंबाना निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही योजना राबविली जात असून या संदर्भातील सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत…
निर्धुर चूलीसाठी पात्रता :-
लाभार्थी हा अनुसूचित जातीचा असावा.
लाभार्थ्याकडे एलपीजी (LPG) गॅस कनेक्शन नसावे.
लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु. 1,12,000 /- किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
निर्धुर चूलीसाठी किती मिळेल अनुदान :-
निर्धुर चूलीसाठी 100% अनुदानावर म्हणजे फ्री निर्धुर चूल मिळणार आहे.
या निर्धुर चूलीची (Biomass stove) साधारणपणे किंमत 4 ते 5 हजारापर्यंत असणार आहे.
हे पण वाचा :
तिरंग्याच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही संतापला!
नीट परीक्षेत गुण कमी पडल्यामुळे तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
गणपती विसर्जनपूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी, मिळेल तुम्हाला इच्छित जीवनसाथी…
पोहण्याचा मोह जीवावर बेतला ; दोन शाळकरी मुलांचा डोहात बुडून मृत्यू, शिरसोलीजवळील घटना
अर्ज कसा आणि कुठे कराल ?
या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी तालुका – जिल्हा स्तरावरील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अर्थात (MPBCDC) च्या कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज कसा कराल ?
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://maha-diwa.vercel.app/ या वेबसाइटला भेट दया..
यामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, पत्ता, तालुका, जिल्हा, इत्यादी माहिती व्यवस्थित भरा अन् अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरा.