बुलढाणा : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नसून अशातच महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना समोर आलीय. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत खुद्द मुख्याध्यापकानेच आपल्या शाळेतील पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
नांदुरा तालुक्यातील मुरंबा येथे ही घटना समोर आलीय. मुरुंबा हे छोटसं गाव आहे. या गावात पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक असून एक शिक्षक अकोला येथून ये-जा करतात व दुसरे मुख्याध्यापक हे शेगाव येथून ये-जा करतात. दरम्यान, संशयित आरोपी मुख्याध्यापक याने शाळेतील पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून मला तुझा अभ्यास चेक करायचा आहे. म्हणून जवळ बोलावून नंतर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर ‘कुणालाही सांगू नको’ अशी धमकीही दिली.
हे पण वाचा :
चालत्या ट्रेनमध्ये मुलीचा पाय घसरला, पुढे काय झाले पाहा ‘या’ धक्कादायक Video
… म्हणून नवनीत राणा पोलिस ठाण्यातच भडकल्या, काय आहे नेमकं प्रकरण?
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 5000 जागांसाठी बंपर भरती
पत्नी माहेरी, घरी एकट्या पतीने उचललं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना
मात्र, मुलीने आपल्या आईला घटना सांगितल्यावर पालकांनी व गावातील नागरिकांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून या नराधम मुख्याध्यापकाची तक्रार केली आहे. यावरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी मुख्याध्यापक कालपासून फरार होता. आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकांकडून आपल्याच विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या एकाच महिन्यात तीन घटना समोर आल्याने आता मात्र शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. पालकांमध्ये व समाजात शिक्षकांप्रती जनभावना उफाळून येत आहेत व पालकांना आपल्या चिमुरड्याना शाळेत पाठवायला भीती वाटत आहे.