जळगाव : आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसतेय. जळगाव २८ वर्षीय युवकाने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपविली. विजय यशवंत अटकाळे (वय-२८) रा. सिंध्दार्थ नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय अटकाळे हा पत्नी व मुलासह रामेश्वर कॉलनीतील सिध्दार्थ नगरात वास्तव्यास असून तो मिळेल तशी मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी माहेरी गेलेल्या होत्या. त्यामुळे ते घरी एकटेच होते. मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री गल्लीतील नातेवाईकांशी गप्पा मारून रात्री घरी गेले.
मध्यरात्री विजयने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे बुधवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. यासंदर्भात शेजारी राहणाऱ्यांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळीधाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.