हिंगणा : एका प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे पण घरचे नातेवाईक आणि समाज काय म्हणेल याचा विचार मनात आला. नातं आड आलं आणि अशा परिस्थिती प्रेमीयुगुलाने हावडा-नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसखाली आत्महत्या केली आहे.
काय आहे प्रकार?
जितेंद्र नेवारे या नावाच्या तरुणाचं आपल्या मावस बहिणीवर प्रेम होतं. त्याचं लग्न झालं होतं. तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा. बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली. बायको माहेरी गेल्यानं तो आईसोबत एकटाच राहायचा. मावस बहिणीचं वरचेवर येणं जाणं होत असायचं. त्यातून एकमेकांना आवडू लागले आणि मग प्रेम झालं.
हे पण वाचा :
मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा एकदा दणका! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नव्याने पाठवणार
छोट्या शिवसैनिकाचे आदित्य ठाकरेंसमोरच घोषणाबाजी ; Video झाला तुफान व्हायरल
NHM : अमरावती येथे 12वी ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी.. त्वरित करा अर्ज
सप्टेंबरमध्ये लक्ष्मी नारायण योगामुळे या राशींच्या लोकांवर पडेल पैशांचा पाऊस?
दोघांनाही लग्न करायचं होतं. नातं विसरले आणि एकमेकांसोबत 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन त्यांनी घेतलं, पण नातेवाई आणि समाज आपल्याला स्वीकारणार नाहीत. एकमेकांशिवाय राहू शकत नाही समाज स्वीकारणार नाही म्हणून मग या दोघांनी टोकाचं पाऊल उचललं. एकमेकांवर जीवतोडून प्रेम करणाऱ्या या प्रेमीयुगुलाने हावडा-नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसखाली आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना खापरी इथे घडली.