पुणे : पुण्यातील तळेगाव दाभाडे येथून एक खळबळजनक घटना समोर आलीय. येथे अनैतिक संबंधातून एका महिलेची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली असून लग्नाचा तगादा लावल्याने ही हत्या करण्यात आली आहे.बजरंग मुरली तापडे( वय ४५), पांडुरंग उर्फ सागर बन्सी हारके ( वय ३५), सचिन प्रभाकर थिगळे (वय ३०), सदानंद रामदास तुपक (वय २६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे आरोपी बजरंग तापडे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. आपण लग्न करू असा तगादा महिलेने बजरंग यांच्याकडे लावला होता. मात्र, बजरंग हा अगोदरच विवाहित होता. त्याला तीन मुले देखील आहेत. मात्र, महिला हे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. आरोपी बजरंग याला या सततच्या बोलण्याचा त्रास होत होता. शेवटी त्याने संबंधित महिलेच्या हत्येची सात लाखांची सुपारी पांडुरंग हारके याला दिली. त्यातले चार लाख ऍडव्हान्स देखील बजरंग याने दिले होते.
हे पण वाचा :
आज शनिश्चरी अमावस्येला या 5 राशींच्या लोकांनी राहावं सावध
बिग ब्रेकिंग ! शिवसेनेची ‘या’ पक्षासोबत युती, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची घोषणा
आज पुन्हा स्वस्त सोनं, चांदीही घसरली; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर
त्यानुसार पांडुरंग हारके याने सचिन थिगळे याला काही रक्कम देत महिलेच्या येण्याजण्याचा मार्ग दाखवला. तसेच बाकीच्या दोन साथीदारांनी तिची रेकी देखील केली होती. मात्र, ९ ऑगस्टच्या सकाळी ती दुचाकीवरून जात असताना तिची गाडी अडवून तिचा गळा चिरून हत्या केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी योग्य तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.