बीड : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. अशातच आता आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आलीय. आई शेतात गेल्याचा गैरफायदा घेत आजोबाने घरात शिरत अल्पवयीन नातीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे समोर आला. दरम्यान, नराधम आजोबा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
माजलगाव येथे ८५ वर्षीय आजोबाने त्यांच्या दहा वर्षीय अल्पवयीन नातीवर अत्याचार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आई शेतात गेल्याचा गैरफायदा घेत आजोबाने घरात शिरत अल्पवयीन नातीवर अत्याचार केलाय. ही घटना आईला घरी आल्यानंतर समजली असता तिने दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठत गुन्हा नोंदवला आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :
आमदार, मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या वेतनात वाढ ; आता ‘इतका’ मिळेल पगार
शुक्रवारची ‘ही’ युक्ती आहे खास, कर्ज आणि पैशाचे संकट चुटकीसरशी दूर होईल!
तरुण-तरुणीचा ‘हा’ Video पाहून बसेल 440 वोल्टचा झटका, एकदा पहाच..
सोन्याच्या दरात तेजी; चांदीही वधारली; काय आहे 10 ग्रॅमचा नवीनतम दर?
माजलगाव येथील पिंक पथकाकडे या प्रकरणाचा तपास वर्ग केला असल्याचं दिंद्रुड पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आरोपी आजोबा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, समाजातील असल्या कृत्याला आणि असल्या घटनेला आळा घालण्याची अत्यंत गरज असल्याचं पुन्हा एकदा पुढे आलं आहे.