मुंबई : तुम्ही जर सोने आणि चांदी खरेदी करण्याची योजना करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. गेले दोन दिवसांपासून सोन्याचे दर स्थिर होते. किंमतीत फारसा बदल झाला नव्हता. मात्र, आज सोमवारी दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली आहे
रविवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 47,800 रुपये होता, सोमवारी हा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 200 रपयांनी घसरल्या आणि हा दर 47,600 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा शुक्रवारचा भाव हा 52,090 रुपये होता, 10 ग्रॅम सोन्यासाठी रविवारी 52,150 रुपये दर होता आज हा दर 10 ग्रॅमसाठी 220 रुपयांनी घसरून 51,930 रुपये झाला. चांदीचा भाव रविवारी 55,600 रुपये किलो होता. तो 400 रुपयांनी घसरुन सोमवारी 55,200 रुपये किलो झाला.
राज्यातील चार शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,600 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,930 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 556 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.