Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला ; जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार, नराधम नात्यातल्याच

Editorial Team by Editorial Team
August 12, 2022
in राज्य
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आलीय. नात्यातल्याच 19 वर्षीय तरुणीला फिरायला जाऊ असा बहाणा करून एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने पीडितेला भंडारा जिल्ह्याच्या पवनीच्या रिसॉर्टवर नेलं. तिथे तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पवनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भंडारा जिल्ह्यात सामूहिक अत्याचाराचं प्रकरण ताजं असतानाच या प्रकाराने जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. सोनू सुरेश नान्हे (22) रा. पवनी असं अत्याचार प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत आहे.

आरोपी सोनू हा पीडितेच्या चुलत मामाचा मुलगा आहे. पीडिता ही भंडारा तालुक्यातील असून तिला दोन मामा आहेत. ते पवनी येथे राहतात. त्यांच्या घराशेजारी चुलत मामा सुरेश नान्हे राहतात. पीडिता ही अधूनमधून मामाकडे पवनीला जात असायची. त्यामुळे तिची आरोपी सोनुसोबत ओळख निर्माण झाली. त्यातून दोघांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर असल्यानं ते मागील अडीच वर्षांपासून संपर्कात होते. 7 ऑगस्टला आरोपी सोनू हा पीडितेच्या गावातील शाळेजवळ पोहचला, तिथून त्याने फोन करून पीडितेला फिरायला जाऊ असं सांगितलं. नकार दिल्यानंतरही आरोपीने तिला भुलथापा देत दुचाकीवर बसवून फिरायला नेलं. त्यानंतर लाखांदूर येथील दुर्गा मंदिरात तिला नेऊन तिथे सायंकाळपर्यंत दोघेही थांबले. रात्र होत असल्यानं त्याने पीडितेला चप्राड येथे त्याच्या बहिणीकडे भाऊजीला बोलावून पोहोचवलं. दुसऱ्या दिवशी 8 ऑगस्टला आरोपी सोनवणे पीडितेला लाखांदूर येथून पवनीला आणले. तहसील कार्यालयाजवळील टायगर रिसॉर्ट मधील 102 नंबरची रूम बुक करून तिथे तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

 हे पण वाचा :

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावात येताच महाजनांनी खडसेंना दिला ‘हा’ इशारा

..आता याबाबत शंका, मंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंना एकनाथ खडसेंनी दिला हा सल्ला

नात्याला कलंक! पतीच्या निधनानंतर मोठ्या दिराचा अत्याचार, पीडित महिला गरोदर, अमळनेर हादरले

दरम्यान, पीडितेने विरोध केला असता ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे मारून टाकेल अशी धमकी दिली. रात्री 10 वाजताच्या सुमारास सोनुने चारचाकी वाहनाने पीडितेला शाळेजवळ सोडल्याची माहिती तक्ररीत नमूद आहे. घरी पोहोचताच पीडितेने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. याप्रकरणी मंगळवारी पीडितेने कारधा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, घटनास्थळ हे पवनी येथील असल्यानं प्रकरण वर्ग करण्यात आलं. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पेट्रोल-डिझेल किती घसरले? जाणून घ्या ताजे दर

Next Post

सोन्याच्या दरात वाढ, काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे भाव?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आज सोने स्वस्त की महाग? खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर

सोन्याच्या दरात वाढ, काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे भाव?

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us