भुसावळ प्रतिनिधी | मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचोरा रेल्वे स्थानकावर रिमाॅडलिंग कामानिमित्त शनिवारी व रविवारी या दिवशी ४ गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी गाड्यांची स्थिती पाहूनच स्थानकावर जावे. अन्यथा गैरसोय होऊ शकते.
रद्द झालेल्या गाड्यांमध्ये इगतपुरी मेमू, सेवाग्राम एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-पुणे त्रिसाप्तहिक गाड्यांचा समावेश आहे. तर अप मार्गावरील ८ व डाऊन मार्गावरील ८ अशा १२ गाड्या विभागातील विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील. म्हणजेच या गाड्या विलंबाने धावतील. यामुळे ऐन सणावाराच्या दिवसात प्रवाशांची गैरसाेय होईल. दरम्यान, ज्या प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण केले आहे, त्यांना स्थानकावरील तिकिट खिडकी किंवा ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात तिकिटांचा परतावा (पैसे) देण्यात येईल.
रद्द गाड्या अशा :
१२११२ अमरावती-मुंबई एक्सप्रेस ही गाडी १४ ऑगस्टला अमरावती, तर १२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस १५ ऑगस्टला मुंबई येथून सुटणार नाही. १२१३६ नागपूर-पुणे त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १३ला नागपूर, तर १२१३५ पुणे-नागपूर त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १४ला पुणे येथून सुटणार नाही. १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू १४ व १५ रोजी भुसावळ, तर इगतपुरी-भुसावळ मेमू १५ व १६ आणि १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस १४ ऑगस्ट, तर १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १५ला रद्द केली आहे.
हे पण वाचा..
शिंदे-फडणवीस सरकारचे खातेवाटपही जाहीर ; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?
सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीची आत्महत्या, तीन महिन्यापूर्वीच झाला होता प्रेमविवाह
सावधान : राज्यातील या भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
पाळणा हलला, दोऱ्या कोणाकडे?…‘सामना’मधून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका
डाउन मार्गावर ४ गाड्यांना थांबा
रविवार व सोमवार दोन दिवस मुंबईकडून भुसावळकडे येणाऱ्या (डाउन मार्ग) चार गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील. त्यात १२६२७ बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस १.१० तास, ११०५५ एलटीटी-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस १.१० मिनिटे, १२७१५ नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस २० मिनटे, ११०६१ एलटीटी-जयनगर पवन एक्स्प्रेस २० मिनिटे थांबवण्यात येईल.
अप मार्गावर ८ गाड्यांना मिळणार थांबा
२२४५६ कालका-साईनगर शिर्डी द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस २.१५ तास, २२५१२ कामाख्या-एलटीटी एसी साप्ताहिक एक्सप्रेस, १२१०८९ सीतापूर-एलटीटी, १७३२४ बनारस-हुबळी साप्ताहिक एक्स्प्रेस, ११०७२ बनारस-एलटीटी कामायनी एक्स्प्रेस या सर्व गाड्या २.१० तास, ११०५८ अमृतसर-मुंबई एक्स्प्रेस ५० मिनिटे, २२५३७ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस ५० मिनिटे, ११०६२ जयनगर- एलटीटी पवन एक्स्प्रेस २५ मिनिटे थांबेल.