नवी दिल्ली : शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांमुळे ठाकरे सरकार पडलं आणि राज्यात शिंदे सरकार आलं. दरम्यान, शिंदे गटाच्या १६ आमदारांविरुद्ध ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात तब्बल चार याचिका दाखल केल्या. यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांकडून घमासान युक्तीवाद झाला असून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.
16 आमदारांविरोधात दाखल याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात हाय व्होल्टेज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान शिंदे यांची बाजू हरीश साळवे यांनी लढवली तर शिवसेनेचे वकील म्हणून कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे बाजू मांडत होते. जोरदार युक्तिवादानंतर कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे पुढची तारीख मागितली त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला वेळ देत पुढची तारीख दिली आहे. तसचे वेळ वाढवून हरीश साळवे यांनीही मागितली होती. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ही निर्णय कोर्टानं दिला आहे. 1 ऑगस्टला पुढची सुनावणी पार पडणार आहे. तर कागदपत्रं सादर करण्यासाठी त्यांना 27 जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आलाय.
हे संवेदनशील प्रकरण आहे. त्यामुळे हे प्रकरण मोठ्या बेंचकडे जावं असेही मत कोर्टानं व्यक्त केलं होतं. मात्र त्यात जास्त वेळ जाईल असा युक्तीवाद वकीलांकडून करण्यात आलाय. या सुनावणीला दोन्ही बाजुने वकीलांची फौज उभी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमना, जस्टिस कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडली आहे.
हे देखील वाचा :
अमिषा पटेलविरोधात कोर्टाकडून वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
खळबळजनक ! शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी, चौघांना अटक
दिशा पटानीने लावला बोल्डनेसचा तडका, काळ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दिसली खूपच ग्लॅमरस
मोठी बातमी ! सुट्या वस्तूंवरील पाच टक्के जीएसटी मागे, पण..
एखाद्या गटाला नवा नेता मिळत असेल तर त्यात गैर काय असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. तसेच आम्हाला कागदपत्रं सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ द्या, अशीही मागणी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी केला. तर शिंदे हे पक्षप्रमुखासारखे कसं वागू शकतात? असा सवाल ठाकरेंच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच पक्षाच्या बैठका घेण्याचा अधिकार हा शिंदेंना नाही, असाही युक्तीवाद करण्यात आला.