- जळगाव शहराचा विकास अभिषेक पाटील सारखा उच्चशिक्षित उमेदवार करू शकत असल्याचा विश्वास – इंटक

जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव शहर मतदार संघांतुन राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार अभिषेक शांताराम पाटील यांना आज महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) रा.प. जळगाव च्या वतीने जाहीर पाठिंब्याचे पत्र जिल्ह्याध्यक्ष भगतसिंग पाटील यांनी दिले. अभिषेक पाटील यांच्या वतीने महानगर जिल्हाध्यक्ष नामदेव चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील, राजेश पाटील मीनलताई पाटील, अनिरुद्ध पाटील यांनी सदर पाठिंब्याचे पत्र स्वीकारले.
जळगाव शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीकडे व्हिजन आहे. जळगावचा विकास व प्रश्न सोडविण्यासाठी योग्य उमेदवार अभिषेक पाटील असल्यानेच आम्ही अभिषेक पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे इंटक च्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी भावना व्यक्त करतांना सांगितले.














