मुंबई,(प्रतिनिधी)- सत्तानाट्य आज अखेर समपुष्टात आलं असून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या २० वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली आहे, दरम्यान सुरवातीलाच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादामुळे मी….. असं म्हणत शपथविधिला सुरवात केली.
एकनाथ शिंदेच्या बंडापुढे महाविकास आघाडीला अखेर पायउतार झाल्याने अखेर आज एकनाथ शिंदे यांनी अखेर भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं आहे. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनीही आजच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आधी फडणवीसांच्या नावाची चर्चा असताना आता अचानक एकनाथ शिंदे यांच्या नावाची थेट मुख्यमंत्री पदाची घोषणा ही बाबही अनेकांसाठी अनपेक्षित होती.आणि त्यात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे देखील सर्वांसाठी धाक्काचं होता.