मुंबई | बंडखोर आमदार गुवाहाटी दौऱ्यावर गेल्यापासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधीही त्यांनी सोडली नाही. बडखोरीच्या नाट्यात शहाजी बापू पाटलांच्या व्हिडीओंनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. त्यामुळे शहाजी बापू पाटील आमदार असले तर सोशल मीडियावरही सेलिब्रेटी झाले. काय झाडी, काय डोंगर आणि हॉटेल या अस्सल गावरान भाषेमुळे शहाजी बापू पाटील चर्चेत आले आहे. दरम्यान, बंडखोर आमदार शहाजी पाटील यांनी शरद पवार यांच्या वर जोरदार टीका केली. पवारांनी ज्यांना ज्यांना जवळ केलं त्यांना काखेत घेऊन मारलं अशा शब्दांत त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला.
वसंत दादा माझे वडिल आहेत, त्यांच्याच आशीर्वादाने मी मोठा झालेलो आहे आणि मी वसंत दादांना कधीच दगा देणार नाही अस शरद पवार म्हणाले होते. आणि त्यानंतर तिथेच बातमी आली की, शरद पवारांनी बंड केलंय. 40 आमदार घेऊन काँग्रेसचं पळून गेलं. लगेच वसंत दादांनी राजीनामा दिला हा इतिहास शहाजी पाटील यांनी सांगितला.
हे देखील वाचा :
मनसेच एकमेव मत कोणाला? राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
टेलर कन्हैयाच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी रस्त्यावर लोळवून तुडवलं! घटनेचा थरारक Video समोर
सारा अली खानने साडी नेसून इंटरनेटवर लावली आग, एकदा फोटो बघाच
बंडखोर आमदारांकडून आसामच्या पूरग्रस्तांसाठी ‘इतक्या’ लाखांची मदत
एवढ होऊनही वसंतराव पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांना पवारांच्या सोबत राहण्यास सांगितले होते. मात्र, जे कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहिले ते कुठेच नाहीत. विलासराव देशमुख आणि सुशिलकुमार शिंदे हे राजीव गांधी यांच्याकडे पळून गेले त्यामुळे ते वाचले. त्यामुळे शिंदेसाहेब तुम्ही काहीही करायला सांगा पण पवारांच्या जवळ नेऊ नका, नाहीतर आपण मेलोच, अस शहाजी पाटील म्हणाले.