भुसावळ | अडीच वर्षानंतर भुसावळ-सुरत पॅसेंजर आता पुन्हा धावणार आहे. १५ जूनपासून ही गाडी सुरु होणार आहे. मात्र या गाडीला पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहेत. आधी सुरत ते भुसावळ या प्रवासासाठी ७० रूपये लागत होते. आता यासाठी १२० रूपये मोजावे लागणार आहेत.
कोरोना पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून भुसावळ सुरत आणि सुरत भुसावळ पॅसेंजर बंद आहे. अद्यापही या गाड्या सुरु झालेल्या नाहीय. मात्र आता या गाडीला पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेसच्या दर्जा देण्यात आला आहे. या गाडीचा क्रमांक देखील ५९०१४ ऐवजी १९००६ व १९००५ असा असेल. थांबे मात्र पूर्वीप्रमाणे पॅसेंजर गाडीचे असतील.
अर्थात, एक्सप्रेसचा दर्जा मिळाल्याने याचे भाडे देखील वाढणार आहे. आधी सुरत ते भुसावळ या प्रवासासाठी ७० रूपये लागत होते. आता यासाठी १२० रूपये मोजावे लागणार आहेत. या गाडीला भादली, जळगाव, पाळधी, चावलखेडे, धरणगाव, भोणे, टाकरखेडे, अमळनेर, भोरटेक, पाडसे, बेटावद, नरडाणा, होळ, सिंदखेडा, सोनशेलू, विखरण रोड, दोंडाईचा, रनाळा, टिसी, नंदुरबार, खांडबारा, चिंचपाडा, नवापूर, उकई, नवा सोनगड, व्यारा, माही, बारडोली, चलथान, उधना असे थांबे आहेत.
सूरत-भुसावळ ही गाडी १३ जूनला रात्री ११.१० वाजता सूरत स्थानकातून सुटेल. ती दुसर्या दिवशी सकाळी ७.५५ वाजता भुसावळात पोहोचेल. तसेच, भुसावळ-सूरत ही गाडी १५ जूनला सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेल. ती दुसर्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता सूरतला पोहोचेल. सदर ट्रेन सुरू झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.