नवी दिल्ली: रोड बॉर्डर ऑर्गनायझेशन (BRO) अंतर्गत येणाऱ्या जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (GREF) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या रिक्त पदांतर्गत, BRO स्टोअर कीपर टेक्निकल आणि मल्टी स्किल्ड कामगारांच्या 876 पदांची भरती करेल.
एकूण ८७६ पदांपैकी BRO द्वारे स्टोअर कीपर टेक्निकलच्या ३७७ पदांवर भरती केली जाणार आहे. या 377 पदांपैकी 157 पदे अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. त्याच वेळी 53 पदे SC, 27 पदे ST, 103 पदे OBC आणि 38 पदे EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.
शैक्षणीक पात्रता : १० आणि १२ वी परीक्षा उत्तीर्ण वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान व मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर आयटीआय प्रमाणपत्र असावे.(जाहिरात पाहावी)
त्याच वेळी, मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) च्या 499 पदांची भरती केली जाईल. या 499 पदांपैकी 167 पदे अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. तर 90 पदे SC, 50 पदे ST, 117 पदे OBC आणि 18 पदे EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.
हे पण वाचा :
पुण्यात 5वी पास ते पदवीधरांसाठी गव्हर्नमेंट जॉबची संधी, त्वरित करा अर्ज
नोकरीची मोठी संधी..’या’ बँकेत 300 हून अधिक पदांची भरती, लगेचच करा अर्ज
नोकरीची संधी; MPSC मध्ये तब्ब्ल 419 रिक्त पदांसाठी भरती
रेल्वेत 3600 हून अधिक पदांची मेगा भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गोल्डन चान्स
या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी रोड बॉर्डर ऑर्गनायझेशन bro.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याची विनंती केली आहे. तसेच, तुम्ही खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे भरती अधिसूचना पाहू शकता.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा