- शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोरअप्पा पाटील यांचा व्यापारी मेळाव्यात निर्धार

पाचोरा- पाचोरा – भडगाव महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्यासाठी पाचोरा शहरात व्यापारी बांधवांचा मेळावा मोठ्या उत्साहत येथील जैन पाठ शाळेत पुनमचंद मोर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
यावेळी आ. किशोर पाटील बोलतांना म्हणाले की, व्यापारी बांधवांसाठी सभागृह उभारणार असून लवकरच त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

व्यापारी मेळाव्या प्रसंगी व्यापारी आघाडीचे भाजपचे कांतीलाल श्रीश्रीमाळ, मुकुंद बिलद्धीकर,भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील ,नारायनदास पटवारी, सुनील पाटील,दीपक सावा, दिनेश अग्रवाल, नासिर बागवान रतनलाल संघवी, भोटुमल नागरणी, अर्जुनदास दाखणेजा,उत्तम बागड, जगदीश पटवारी, बापू सोनार, आयुब बागवान दत्ता पाटील, नंदू सोमवंशी, राजेंद्र भोसले, भरत शेठ, मेघराज केसवणी, मूर्तिजाशेठ बोहरी, भरत शेंडे,शरद महालपूरे, गंगाराम तेली, शाम खंडेलवाल, रवी केसवणी, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, सुरेश पाटील ,नरेंद्रसिंग सूर्यवंशी, प्रमोद ललवाणी,यांचेसह शेकडो व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मुकुंद बिल्डींकर यांनी पाचोरा शहरात गेल्या ५ वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा आढावा सांगून भविष्यातील प्रस्तावित कामांची माहिती सांगितली. भाजप व्यापारी आघाडी चे कांतीलाल श्रीश्रीमाळ यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी विशद करून आ किशोर पाटील यांनी केलेल्या विकास कामांचा गौरव केला.यावेळी आ किशोर पाटील यांनी आपल्या भाषणात व्यापारी बांधवांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याने समाधान व्यक्त करून केलेल्या कामांची माहिती दिली यात शहरातील पाणीपुरीवठा योजना १८५ कोटीची गिरणा धरणाहुन आणण्याची योजना प्रस्तावित केली, ७०कोटीची भूमिगत गटार योजना, शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे मात्र भूमिगत गटार पूर्ण झाल्यानंतर ८२ कोटीचे रस्त्यांचे काम काँक्रीटीकरण पूर्ण केले जाईल.असेही सांगण्यात आले.