मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जून रोजी अयोध्या दौरा होणार होता. मात्र हा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. याबाबत राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली आहे.
22 मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत. अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची अधिकृत घोषणा राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी आज शुक्रवारी सकाळी ठीक दहा वाजता याबाबत ट्वीट केलंय. आता पुण्यात 22 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी पुण्यात मनसैनिकांकडून करण्यात येतेय. या सभेमध्ये राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत.
हे पण वाचा :
गृहिणींसाठी दिलासा देणारी बातमी ! खाद्यतेलाचे दर स्वस्त होण्याची शक्यता
तरुणांनो उठा तयारीला लागा ; राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती
सावत्र आईवर मुलाचा जडला जीव, लग्नही केलं; नंतर वडिलांनी गाठले पोलीस स्टेशन
बायकोला प्रियकराच्या मिठीत पाहिलं, हताश पतीने सुसाईड नोट लिहून घेतला गळफास
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. राज ठाकरेंनी याआधी केलेल्या आपल्या भाषणांमधून उत्तर भारतीय जनतेचा अपमान केला असल्याचं आरोप बृजभूषण सिंह यांनी केल्यानंतर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अधिकच चर्चेत आला होता. दरम्यान, आता राज ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याचं स्पष्ट केलंय.