जळगाव : देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. वाढत्या माहागाईविरोधात जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. दरम्यान पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे भडकल्या. यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला, तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
भाजप पक्षातील एक कार्यकर्ता महिलेवर हात उचलतो. याची त्या पक्षाला लाज वाटली पाहिजे. महिलेवर हात उचलणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपने पक्षातून बाहेर काढले पाहिजे. असे कृत्य आतापर्यंत महाराष्ट्रात कधीही झाले नाही. मात्र, भाजपने हे कृत्य केले आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
भाजपकडून महिलांवर असाच अन्याय होत राहिल्यास आम्ही आमच्या भाषेत त्यांना धडा शिकवू. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. महिलेच्या अंगावर एकदा हात उगारला. पुन्हा उगारू नका. कारण आता अती झालं आहे. अन्यथा या लोकांचे घरातून बाहेर पडण्याचे वांद्ये होतील, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.
हे पण वाचा :
दोन मुलांना चालत्या ट्रेनमधून फेकले, नंतर स्वतः मारली उडी; धक्कादायक Video समोर
शिधापत्रिकेत हे अपडेट त्वरित करा, तुम्हाला नेहमीच रेशन मिळेल; येथे जाणून घ्या सोपी प्रक्रिया
आता महाजनांची घरी बसण्याची वेळ आलीय.. खडसे यांचा टोला
एअर होस्टेसचा डान्स पहिला का? Video पाहून फॅन व्हाल!
राष्ट्रवादी आमदाराच्या गाडीला अपघात, बस व कारमध्ये धडक
‘बेटी बचाव, बेटी पढाव’ सांगणाऱ्यांची ही संस्कृती आहे का? माझ्या महिला कार्यकर्त्यांने चुकी केली असती तर मी स्वतः स्मृती इराणी यांची माफी मागितली असती. माफी मागण्यांमध्ये काही कमीपणा नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. मात्र, एखादी घोषणा दिल्याने हात उगारला जातो, हाच यांचा पुरुषार्थ आहे का?, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. हे शाहू आणि छत्रपतींचे नाव घेतात. हे छत्रपतींनी शिकवलं आहे का महाराष्ट्रात? ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. या प्रवृत्तीविरोधात कायद्याने लढू. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी मी स्वतः करणार आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्या तिन्ही भाजप कार्यकर्त्यांना अटक करून शिक्षा केली नाही, तर शिक्षा होईपर्यंत आपण सगळ्यांनी आंदोलन करायचं, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला.