यावल : यावल आगाराची बस दुपारी २ वाजेच्या सुमारास यावलकडून भुसावळकडे जात होती. मात्र, अचानक रस्त्यालगतचे मोठे झाड बसवर कोसळले. या दुर्घटनेत १२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर चालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळवले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
काय आहे नेमकी घटना?
यावल आगाराची बस क्रमांक एमएच २०, बीएल २५४२ ही दुपारी २ वाजेच्या सुमारास यावलकडून भुसावळकडे जात असताना अचानक रस्त्यालगतचे मोठे झाड बसवर कोसळले. यात चालकासह १२ जण जखमी झाले. या घटनेत बसचा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, यावल आगार प्रमुख जितेंद्र जंजाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. जखमींची विचारपूस करत घटनेची माहिती जाणून घेतली. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला आणि डॉ. मनिषा महाजन यांनी उपचार सुरू केले आहेत
हे पण वाचा :
सुवर्णसंधी.. आसाम राइफल्समध्ये 10वी पास उमेदवारांसाठी मेगा भरती, आताच अर्ज करा
बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा
भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 पदांची बंपर भरती, ग्रॅज्युएट पाससाठी सुवर्णसंधी..
मुक्ताईनगरात सराफ दुकानावर दरोडा, तब्बल ३० लाखांचे दागिने लंपास
मोठी बातमी: राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाची नोटीस, काय आहे नेमकं कारण?
हे झाले जखमी
या अपघातात सुरेश पंढरीनाथ महाजन (वय-७०), पंडित लक्ष्मण परणकर (वय-६६), शकुंतला विलास चौधरी (वय-६०), सुशिलाबाई किसन धनगर (वय-६०), जोवरा रशीद खाटीक (वय-५०), सुरेश पंढरीनाथ महाजन (वय-५२), पद्माबाई रमेश कोळी (वय-५०), मंगला रामदास चौधरी (वय-५५), कल्पना संतोष चौधरी (वय-५५), दीपक येवलू वानखेडे (वय-२४) आणि नीलम शैलेंद्र पाटील (वय-१७) असे १२ जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.