नागपूर : राज्यातील अनेक भागात सूर्य आग ओकतोय. अनेक ठिकाणी अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचं सावट आहे. १२ मेनंतर नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून त्या काळात विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे १२ ते १८ मे या काळात विदर्भात पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांमधील तापमान हे सरासरी किंवा त्यापेक्षाही कमी असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भवासीयांना अजूनही उन्हाच्या चटक्यांपासून फारसा दिलासा मिळालेला नाही. सलग दुसऱ्या दिवशी विदर्भ देशात ‘हॉट’ ठरला. येत्या रविवारपासून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, १२ मेनंतर नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून त्या काळात विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.