
पाचोरा- भडगाव शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज युवासेनेचे युवानेते तथा आमदार पुत्र सुमित किशोर पाटील यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली आहे.भडगाव तालुक्यातील निंभोरा,कनाशी, देव्हारी या गावांना भेटी दिल्या. जनतेचे आशीर्वाद घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. निंभोरा परिसरातून किशोर आप्पा यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून परिसरातील जनता हि आप्पा यांच्या विकास कामे तथा जनतेतील संपर्काबाबत समाधान व्यक्त करीत असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे प्रचार रॅलीतून दिसून आले.
यावेळी यांच्या सोबत युवासेने जिल्हासरचिटणीस लखीचंद पाटील, रवींद्र पाटील तालुका प्रमुख युवासेना,विश्वास पाटील,अरुण पाटील,गोपाल पाटील,हर्षल पुजारी,रघुनंदन पाटील,राजू चव्हाण,युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील, समाधान पाटील, भागवत पाटील, सूरज जगताप,तुकाराम पाटील, अक्षय जैन,इंद्रजित पाटील,,पप्पू पाटील,भारत पाटील आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.














