नवी दिल्ली : ईशान्य रेल्वेच्या वतीने प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने ३० एप्रिलपासून इज्जत नगर ते वांद्रे टर्मिनस दरम्यान द्विसाप्ताहिक विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली. आठवड्यातून शनिवार आणि सोमवारी ही ट्रेन इज्जत नगर येथून धावणार आहे.
मात्र आता या ट्रेनच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. आता ही गाडी वांद्रे टर्मिनसऐवजी बोरिवलीपर्यंत चालवण्यात येणार आहे. ईशान्य रेल्वेचे प्रवक्ते पंकज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ०९००६ इज्जतनगर-वांद्रे टर्मिनस स्पेशल ट्रेन, ३० एप्रिल ते १८ जून २०२२ पर्यंत दर शनिवार आणि सोमवारी इज्जतनगर ते वांद्रे टर्मिनसऐवजी इज्जतनगर ते बोरिवलीपर्यंत धावेल. .
अपरिहार्य कारणांमुळे या गाडीचा प्रवास बोरिवलीत संपणार आहे. ही ट्रेन बोरिवली येथे 03.57 वाजता प्रवास संपवेल.