पाचोरा (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस.काँग्रेस. रिपाई (कवाडे गट)शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष मित्र पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ आज गाडगेबाबा नगर, भास्कर नगर, या भागात माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचे पुत्र भूषण वाघ व पुतणे आकाश वाघ यांच्या नेतृत्वात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी परिसरातील बहुसंख्य कारकर्ते सहभागी झाले होते.यावेळी ढोल ताशा रॅली परिसरात फिरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषणा देत परिसर दणाणून गेला “दिलीप भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है”, मतदार राजा जागा हो, राष्ट्रवादीचा धागा हो अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. यावेळी ठिक ठिकाणी माता बघिणी औक्षण करीत होत्या,प्रचार रॅली प्रसंगी नागरिकांन मध्ये उत्साह व परिवर्तन होणारच असे दिसुन आले. प्रचार रॅलीचे नेतृत्व प्रमुख मतदारांशी प्रत्यक्ष भेटुन संवाद साधत होते.आमचा हक्काचा माणुस हवा तो फक्त राष्ट्रवादीचा असे काही ठीकाणी नागरीकांचे संवाद साधत प्रसंगी नागरीकांनी बोलुन दाखवत होते.स्वयस्फुर्ती ने नागरीक प्रचार रॅलीचे स्वागत करीत होते.प्रचार रॅली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.