जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईमधील ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ला म्हणजे एक प्रकारच षडयंत्र आहे. जाणीवपूर्वक कटकारस्थान करून शरद पवारांना बदनाम करण्याच कुणाच तरी कटकारस्थान आहे, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली. कटकारस्थान करणाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर शासन करण्याची मागणीही त्यांनी केलीय.
शरद पवार हे राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत केंद्रातील मंत्रिमंडळामध्येही त्यांनी काम पाहिलं आहे. त्यांच्या कालखंडामध्ये अनेक चढ उतार त्यांनी पाहिले. कामगारांचे, शेतकरी, गिरणी कामगार असे अनेक लोकांचे प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी त्यांनी अनेकवेळा पुढाकार घेतला. संपूर्ण त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक संप झाले.
हे पण वाचा :
आज राम नवमी, जाणून घ्या कोणत्या राशीसाठी असेल शुभ दिवस
जळगावात पुन्हा खून, प्रौढाची दगडाने ठेचून हत्या
Video ! उर्फी जावेदने घातला असा ड्रेस कि करावा लागला अश्लील कमेंट्सचा सामना
भयंकर अपघात ; भुसावळात ट्रक थेट भरवस्तीत घातला, एक तरुण ठार
अगदी मधल्या कालखंडामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा संप झाला होता कित्येक महिने चाललेल्या या संपामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या माध्यमातुन मध्यस्थी करून हा संप सोडवला होता. याप्रमाणे अनेक महाराष्ट्रातले प्रश्न त्यांनी सोडवला असल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले.














