- आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या शक्तिप्रदर्शनासह करणार अभिषेक पाटील भरणार उमेदवारी अर्ज
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर मतदार संघासाठी अभिषेक पाटील आज शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी 12 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
बुधवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी कॉग्रेसने 77 मतदार संघातील उमेदवारी जाहिर केली होती. यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर सोडून सात जणांची नावे जाहीर केली होती.काल सकाळी दुसऱ्या यादीत जळगाव शहर मतदार संघासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने अभिषेक पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आज 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यासाठी आघाडीच्या उमेदवाराच्या अर्ज दाखल करण्यासाठी आघाडी पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहणार असून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.