पाचोरा :- पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथे चुलतिस तीन पुतण्यांनी रात्री बारा वाजता आम्हास आताच खिचडी बनवून दे असे सांगीतल्याने चुलतीने मी एवढ्या रात्री तुम्हाला खिचडी बनवून देवू शकत नाही, असे सांगून नकार दिल्याने पुतण्यांनी तीला जबर मारहाण केली. हे सहन न झाल्याने चुलतीने रात्री २:३० मिनीटांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात मयत महिलेच्या पतीने गुन्हा दाखल केला असून पोलीसांनी तातडीने संशयीत आरोपीस अटक केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मयत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केली आहे.
तारखेडा खुर्द येथे शंकर महारु जाधव (वडर) हे पत्नी दोन मुली व एक मुलासह राहत असत दिनांक ४ रोजी चुलत भावाचे मुले रमेश आत्माराम जाधव (वडर), शिवराम आत्माराम जाधव, व सुनील आत्माराम जाधव रा.सर्व तारखेडा हे दिनांक ४ रोजी रात्री बारा वाजता दारुच्या नशेत तर्र होवून आले व चुलती सोनाबाई शंकर जाधव ही तू आम्हाला आताच्या आता खिचडी बनवून दे असे सांगीतल्याने चुलतीने मी एवढ्या रात्री तुम्हाला खिचडी बनवून देवू शकत नाही असे संबोधून विरोध केला. यावेळी तीघे पुतण्यांनी सोनाबाई शंकर जाधव वय ३५ हीस शिवीगाळ करून मारहाण केली. या पूर्वीही दोन वेळा मारहाण केल्याने तीचा केलेला अपमान सहन न झाल्याने तीने घराचे छताला गळफास घेऊन आत्महत्या केली,मयत सोनाबाई जाधव हीस तीचे चुलत पुतणे नेहमीच मारहाण करीत असल्याने तीने आत्महत्या केली त्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी चांदणे कुर्हे ता. अमळनेर येथील मयताचा भाऊ भिका आण्णाराव शिंदे व माहेरच्या मंडळींनी केली. पोलीसांनी संशयीत आरोपी रमेश जाधव, शिवराम जाधव, व सुनील जाधव यांना अटक केली आहे.













