मुंबई: पाच राज्यांच्या निवडणूक निकाल जाहीर होत आहे. यात उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवणार असल्याचं दिसत आहे. यामुळे भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील नेत्यांनी महाविकास आघाडीवर नव्या जोमाने हल्लाबोल सुरू केला आहे. ‘यूपी तो झाँकी है… महाराष्ट्र अभी बाकी है’ असे सूचक वक्तव्य भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलं आहे.
देशात एक नेतृत्व नागरिकांनी मान्य केलं आहे आणि ते म्हणजे भाजपचं आहे. भाजपचे विचार, त्यांचे कर्तृत्व, वागणं, बोलणं यावर नागरिकांचा विश्वास आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत चार राज्यांत भाजपने मुसंडी मारली आहे. भाजप बहुमत मिळवत मुख्यमंत्री बसवणार आहे. संपूर्ण देश हा लवकरच भाजपामय होईल. उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, महाराष्ट्रात देखील त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील.
5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे परिणाम महाराष्ट्रात लवकरच दिसून येतील असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केले आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.