Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदाचा हेल्प फेअर ४ ठरेल अधिक रंजक

najarkaid by najarkaid
March 9, 2022
in जळगाव
0
यंदाचा हेल्प फेअर ४ ठरेल अधिक रंजक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.९, (प्रतिनिधी)- लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित, मल्हार हेल्प फेअर ४ हा सेवाकार्याचा मेळावा येत्या १२ से १४ मार्च २०२२ दरम्यान सागर पार्क येथे संपन्न होणार असून त्यात या वर्षी नवीन संकल्पनाना समाविष्ट करण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच या वर्षी शासकीय योजना, रोजगार मेळावा, खान्देशी खादय जत्रा, करमणूक आणि हॉबी डूबी डू हा विभाग तसेच विविध क्षेत्रातील सेवादूतांचा सत्कारही या सोहळ्यात करण्यात येणार आहे. हेल्प फेअर हा असा सोहळा आहे जिये विविध सेवाभावी संस्था गरजवंत व दाते सगळे एकाच ठिकाणी एकत्र येत असतात. सेवाभावी संस्थाचे मनोबल वाढविणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांना मदतीचा हात देणे यासोबतच समाजाला समाजऋण फेडण्याचे नवनवे मार्ग दाखविणे, विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, दातृत्व जगविणे, तरुण पिढीला सेवाकार्यात करियरच्या नवीन वाटा दाखविणे हि या आयोजनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रामुख्याने याच हेतूने या सोहळ्याची मांडणी करण्यात आलेली आहे.

राज्यभरातील संस्थांचा समावेश

स्थानिक लोकांना प्रेरणा मिळण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या सेवाभावी संस्थाना महाराष्ट्रातून हेल्प फेअर ४ मध्ये आमंत्रित करण्यात आले असून त्यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, धुळे, नंदुरबार येथील संस्थांचा समावेश आहे.

शासकीय योजनाची माहिती व लाभ: या वर्षी माननीय जिल्हाधिकारी श्री अभिजीतजी राऊत यांच्या पुढाकाराने उपयुक्त अशा शासकीय योजनांची माहिती येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात सामाजिक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व कृषी विषयक योजनांचा समावेश असेल.

रोजगार मेळावा.

एन.टी. टी. एफ. च्या वतीने, भारत सरकारच्या ‘कमवा आणि शिका अभियाना अंतर्गत, रविवारी दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान मल्हार हेल्प फेअरमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. आय.टी.आय. आणि इयता बारावी विज्ञान उत्तीर्ण निवडक विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स, पुणे येथील प्रतिनिधी तीन वर्षासाठी कंपनीत समाशिष्ट करतील.

‘हॉबी डूबी डू विभाग

विद्यार्थी मित्रांसाठी या वर्षी हेल्प फेअरमध्ये विविध विषयांवरील देखावे साकारण्यात येत आहेत या माध्यमातून अपंग, अंघ आणि गरीब होतकरू मुलांच्या कलांचे सादरीकरण केले जाईल. मुलातील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी हॉबी डूबी डू या विशेष विभागाचे समायोजन येथे करण्यात आले आहे, ज्यात स्पोर्टस डान्स, आर्ट, म्युझिक यासारख्या छंद वर्गाचे स्टॉल्स लावण्यात येतील.

दोन दिवसीय कार्यशाळा

दर वर्षाप्रमाणेच हेल्प फेअरमध्ये सेवा संस्थांच्या मार्गदर्शन आणि उत्थानासाठी, त्याच्या प्रगतीसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन १३ आणि १४ मार्चला दुपारी ते ५ वाजेदरम्यान हॉटेल कोझी कॉटेजमध्ये करण्यात आले आहे. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापुवरच्या श्रीमती कांचनताई परुळेकर आणि सर्जना मेडिया, मुंबईचे श्री मिलिंद आरोळकर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.

सेवामहर्षी आणि सेवादूत पुरस्कार वितरण सोहळा : दर वर्षाप्रमाणेच या सोहळ्यात उत्कृष्ट सेवाभावी संस्थांना पुरस्कृत करून सन्मानित करण्यात येणार आहे. विविध स्तरांवर समाजात निःस्वार्थ भावनेने सेवाव्रत असलेल्या सेवा महर्षीनादेखील सन्मानित करण्यात येणार असून शहरातील ५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतादूत’ हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. मान्यवरांची व्याख्यानेही दररोज असतील.

खान्देशी खाद्यपदार्थाची जत्रा

बचत गटांना उत्पन्न मिळावे आणि प्रदर्शनात आलेल्यांना जत्रेची मजा चाखता यावी, यासाठी हेल्प फेअरमध्ये विविध बचत गटांचे, खान्देशी पदार्थाचे स्टॉल्सही लावले जातील. करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी तीनही दिवस असेल.

कुटुंबातील प्रत्येकाला सेवाभावी संस्थांच्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न : प्रत्येक स्टॉलवर आपण त्या संस्थेच्या कार्याशी कसे जुळू शकतो, पैशा शिवायही आपण त्यांना काय देऊ शकतो, याबाबतची माहिती मिळेल. जेणेकरून प्रत्येक नागरिक त्यांचे आवडते कार्य करणाऱ्या संस्थेशी आपल्या परिस्थितीनुसार जुडू शकेल. आणि या योगे एक आनंदाची, समाधानाची अनुभूती मिळवेल. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनात यावे आणि एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घ्यावी, असे हेल्प फेअर टीम चे श्री. भरतदादा अमळकर, श्री. प्रकाश चौबे, श्री. गनी मेमन, श्री. नंदू अडवाणी, श्री. अमर कुकरेजा, श्री. चंद्रशेखर नैवे, श्री. प्रशांत मल्हारा व श्री. आनंद मल्हारा यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘पिक्चर अभि बाकी है,’.. देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

Next Post

के.सी.ई. सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड रिसर्च येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us