गडचिरोली : गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत तैनात पोलीस शिपायाने स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. प्रमोद शोकोकर असे मयत जवानाचे नाव आहे. तो मूळ बुलडाणा येथील रहिवासी होता.
गडचिरोलीतील अहेरी उपविभागीय अंतर्गत ताडगाव पोलीस स्टेशनमध्ये प्रमोद शोकोकर हे कार्यरत होते. ताडगाव पोलीस स्टेशन येथून काही दिवसांपूर्वीच तो आमदार धर्मराव आत्राम आमदार यांच्याकडे सुरक्षा गार्ड म्हणून रुजू झाला होता. कुटुंबातील तणावामुळे त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आहे.