मुंबई : अंगाला काटा आणणारा एक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रेल्वेच्या धडकेतून दुचाकीस्वार कसा बचावल्याचं दिसून येत आहे. भरधाव वेगात असलेल्या ट्रेनमुळे त्याच्या बाईकचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. नेमकी अशीच एक घटना गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात घडली होती, जिथे ट्रेनने बाईक उडवली होती आणि त्या व्यक्तीचा थोडक्यात जीव वाचला होता.
ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओवरील टाईम स्टॅम्पमध्ये ही घटना 12 फेब्रुवारीच्या संध्याकाळी घडल्याचे दिसून येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन राजधानी एक्स्प्रेस असून ही घटना मुंबईची आहे. व्हिडिओमध्ये, तो व्यक्ती आपली बाईक सोडून शेवटच्या क्षणी आपला जीव कसा वाचवतो हे बघू शकता. ही क्लिप पाहिल्यानंतर इंटरनेट यूजर्संना चांगलाच धक्का बसला आहे.
येथे व्हिडिओ पहा:
Smithereens…bike and train!???????????? pic.twitter.com/3IGwtGHDLI
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) January 27, 2021
काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी लोक आपला जीव कसा धोक्यात घालतात, या व्हिडिओवर यूजर्स कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “त्यामुळे… त्याची बाईक खराब झाली. त्याला 440 व्होल्टचा धक्का बसला असावा. त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे आणि हे सर्व काही मिनिटांचा वेळ वाचवण्याच्या प्रयत्नात घडले.
Smithereens 2022… bike and train???????????? https://t.co/alAgCtMBz5 pic.twitter.com/jBwFDeGGYA
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) February 14, 2022