सातारा : साताऱ्यातील रविवार पेठेत धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर एका तरुणाला चक्क उकळल्या चुन्याच्या देवळीत ढकलून दिलं. या घटनेत संबंधित तरुण 9 टक्के भाजल्याने जखमी झाला आहे. समाधान मोरे असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
रविवार पेठेत चुना गरम करण्याचं काम चालतं. त्याच ठिकाणी एका तरुणाला एका दारु प्यायलेल्या व्यक्तीने मारहाण केली. त्यानंतर त्या तरुणाला चुना गरम करत असलेल्या देवळीत ढकलले. या तरुणाचा हात 9 टक्के भाजला आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.
या प्रकरणातील पीडित तरुणाचा जबाब पोलीस घेत आहेत. या तरुणाचा जबाब नोंदवून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात येईल. या तरुणासोबत हे कृत्य करणाऱ्या आरोपी विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
हे देखील वाचा :
खाद्यतेल यापुढे महागणार नाही, सरकारने उचलले मोठे पाऊल
पंजाब नॅशनल बँकेत 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच पाठवा अर्ज
धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवत नर्स तरूणीवर पाच महिने अत्याचार
जिओचा सर्वात जबरदस्त प्लॅन! कमी किमतीत मिळतील जास्त डेटा आणि अनेक फायदे