अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुकबधीर १६ वर्षीय मुलीवर दोन जणांनी सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीला आला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे तर दुसरा फरार आहे.
अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारी मुकबधिर १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून अल्पवयीन मुलगी ही मुकबधिर असल्याचा गैरफायदा घेत गावातील दिपक नाना भिल आणि लखन उर्फ अंकुश बुध भिल यांच्यासह इतर काही मुलांनी तिला गेल्या सात महिन्यांपासून शेतात घेवून जावून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
हे देखील वाचा :
राज्यातील या जिल्ह्यांना कडाक्याच्या थंडीचा इशारा
तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्री बबिता अडचणीत वाढ ; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, पाचोऱ्यातील धक्कादायक घटना
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात मोठी बातमी
CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 12वी उत्तीर्णांसाठी बंपर रिक्त जागा
या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. हा प्रकार अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या वडीलांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी ३० जानेवारी रोजी रात्री अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दिपक नाना भिल आणि लखन उर्फ अंकुश बुध भिल यांच्यासह इतर गल्लीतील मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहे. यातील संशयित आरोपी लखन उर्फ अंकुश बुध भिल याला अटक केली आहे.