पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीच्या वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता असून राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दोन दिवसानंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पाऊस तर गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धूळे,नंदुरबार, जळगाव,आणि नाशिक, जालना,परभणी , नांदेड, हिंगोली,औरंगाबाद या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज पून्हा धूरकट वातावरण तयार झालंय. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 160 वर आहे. त,र काही ठिकाणी हा 187 वर पोहोचलाय. हायवेवर दृष्यमानता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचाही अंदाज हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा :
तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्री बबिता अडचणीत वाढ ; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, पाचोऱ्यातील धक्कादायक घटना
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात मोठी बातमी
CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 12वी उत्तीर्णांसाठी बंपर रिक्त जागा
रविवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, कर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. पुढील 48 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.