वर्धा : वर्ध्या जिल्ह्यातील सेलसुरा इथं झालेल्या भीषण अपघातात ७ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेननंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होत. घटनेच्या सात दिवसानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या अपघातात आमदार विजय रहांगडाले तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र यांचा एकुलता एक मुलगा अविष्कार रहांगडाले यांच्यासह 7 मित्रांचा मृत्यू झाला होता. यात गाडी अतिशय वेगाने असून रस्त्यावरून जातं असलेल्या एका फॉरटूनर कारसोबत रेसिंग लावल्याची चर्चा आहे. हा व्हिडीओ अपघाताच्या काही वेळ पूर्वीचा असल्याच सांगण्यात येतं आहे.
हे सर्व सोमवारी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नागपूर तुळजापूर महामार्गवरील इसापुर जवळील माँ की रसोई या हॉटेलमध्ये पोहचले होते. यानंतर रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी ते जेवणासह वाढदिवस साजरा करून निघून गेले. येथूनच सावंगीला परत जात असताना सेलसुराजवळ हा भीषण अपघात झाला आणि यात सातही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
हे देखील वाचा :
तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्री बबिता अडचणीत वाढ ; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, पाचोऱ्यातील धक्कादायक घटना
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात मोठी बातमी
CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 12वी उत्तीर्णांसाठी बंपर रिक्त जागा
या घटनेच्या सातव्या दिवशी सोशल मीडिवायर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अपघाताच्या काही वेळ पूर्वीचा असून यात अपघातग्रस्त झालेला एक्सयुवी वाहन हे भरधाव वेगात चालवत असल्याच दिसते. हा व्हिडीओ अपघाताच्या पहिले यातीलच मृतक शुभम जयस्वाल याच्या इंस्टाग्रामच्या स्टेटसवर असल्याची माहिती आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.