गेल्या काही दिवसांमध्ये साऊथ चित्रपटांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे अशातच नुकताच रिलीज झालेला अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा‘ चित्रपट मोठ्या चर्चेत आहे. सर्वत्र या चित्रपटाची खास चर्चा ऐकायला मिळत आहे. विविध भाषांमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. हिंदी, मराठी अभिनेते, अभिनेत्री या गाण्यांवर रिल बनवून मजा करतांना सोशल मीडियावर पाहायला मिळत असतांना आता ‘पुष्पा’ खास चित्रपट मराठी भाषेत येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
‘पुष्पा’ चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हा एक बहुभाषिक चित्रपट असून हिंदी कन्नड सह अनेक भाषेत डब झाला आहे. पुष्पा चित्रपटाच्या डब व्हर्जनला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, ‘पुष्पा: द राइज’ने आतापर्यंत २४७ कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. आता हा चित्रपट मराठीतही डब होणार याची चर्चा असून मराठी मधील चित्रपटाचा ‘ट्रेलर’ समोर आला आहे.
पुष्पा चित्रपटाच्या श्री वल्ली… गाण्यावर थिरकली सैराट फेम आर्ची ; पहा व्हिडीओ
‘पुष्पा’ चित्रपटातील गाणे,डायलॉग ते अल्लू अर्जुनच्या चालण्याची पद्धत प्रत्येक गोष्टीवर रिल्स आणि व्हिडिओ तयार होत आहेत. असाच एक व्हिडिओ ‘खास रे टीव्ही’, या यूट्यूब चॅनलने तयार केला आहे.पुष्पा चित्रपटाचा मराठी भाषेतील ट्रेलर या युट्युब चॅनल ने बनवला आहे.हे चॅनल वेगवेगळ्या भाषेतील गाण्यांना भन्नाट मराठी चाली लावून व्हिडिओ तयार करतात. या टीमने अल्लू अर्जुनच्या या दमदार चित्रपटाला मराठीचा झणझणीत तडका देत मराठी ट्रेलर प्रेक्षकांसाठी उपलब्ध केला आहे.