दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे.या चित्रपटातील जवळपास सर्वच गाणे सुपरहिट झाल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांच्या ओठावर तर गाणी आहेतच मात्र मराठी, हिंदी अभिनेत्री यांना देखील या गाण्यांनी भुरळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान रविवारी मराठी अभिनेत्री सैराट फेम आर्ची रिंकू राजगुरू ने इंस्टाग्राम अकाउंटवर पुष्पा सिनेमातील ‘श्री वल्ली…’ या गाण्यावर थिरकल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CZEAM84B9x_/?utm_source=ig_web_button_share_sheet
हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ह्यातली गाणीही तितकीच लोकप्रिय ठरतांना दिसत आहे. पुष्पा चित्रपटातील नायिका रश्मिका मंदानावर चित्रित झालेलं बलम सामे..सामे हे गाणं देखील तुफान हिट झालं आहे. यातली सिग्नेचर स्टेप कॉपी करुन त्यावर ट्रेडींग रील करण्याचा मोह बिग बॉस मराठी सीझन ३ मध्ये आपल्या जबरदस्त खेळीने नेहमीच चर्चेत राहाणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ देखील थिरकतांना दिसली.सोशल मिडीयावर मीरानेसुध्दा नुकताच ‘सामे सामे’ वर थिरकतानाचा जबरदस्त रील व्हिडीओ शेयर केला आहे.
Comments 1