Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ! जळगाव जिल्ह्यातील ‘या’ भागातील १ ली ते १२ वीच्या शाळा सुरू होणार

Editorial Team by Editorial Team
January 22, 2022
in जळगाव
0
कोविडमुळे अनाथ झालेल्यांना तातडीने लाभ देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्य सरकारने २४ जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद व मनपा क्षेत्र वगळून फक्त ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळा सुरू करण्याची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.  या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात वर्ग सुरू करतांना नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शाळा सुरू करतांना पूर्ण काळजी घेण्याचे आवाहन केले असून विद्यार्थ्यांना सुध्दा त्यांच्या वयोगटानुसार आवश्यक असणार्‍या लसींचे डोस देण्यात यावेत असे निर्देश ना.पाटील यांनी दिल्यात.  तर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ग्रामीण भागातील शिक्षणसंस्था आणि शाळांनी नियमांचे तंतोतंत पालन करून वर्ग सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

काय आहेत नियमावली?

ज्या गावात ऍक्टिव रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी आहे अशा गावात संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या स्थानिक शाळा समिती च्या मान्यतेने दिनांक २४/१/२०२२ पासून शाळा सुरू कराव्यात.

शाळेत कोणत्याही खेळाच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, गॅदरिंग, सामूहिक विद्यार्थी नृत्य, कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार नाहीत.

शासन परिपत्रक २० जानेवारी २०२२ मधील तसेच या पूर्वी निर्गमित केलेल्या सर्व शासन परिपत्रकातील निकषांचे पालन करणे बंधनकारक राहील.

शाळेतील सर्व शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण झाले आहे याची खात्री करून घेण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची राहील.(ज्या कर्मचार्‍यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार लसीकरण करण्यास मनाई केली असेल असे कर्मचारी वगळून )

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या बाबतीत १५ ते १७ वयोगटातील सर्व पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण आठ दिवसाचे आत करून घेण्याची जबाबदारी त्या त्या वर्गाचे वर्गशिक्षक संबंधित शाळेचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांची राहील. संबंधित सर्व पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्यासंदर्भात वेळोवेळी शाळा भेटी करून, मार्गदर्शन करून व आरोग्य विभागाशी समन्वय साधून लसीकरण करून घेण्याची
जबाबदारी सर्व संबंधित घटकांची राहील.

गटसाधन केंद्रातील साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, फिरते विशेष शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, आणि गटशिक्षणाधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करुन भेटीचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांना सादर करावा. गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्याचा एकत्रित अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना सादर करावा.

शाळेतील १०० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.

संदर्भीय शासन परिपत्रकातील परिशिष्ट-अ मधील १ ते ९ बाबी आणि परिशिष्ट-ब मधील १ ते १६ बाबींचे पालन करणे बंधनकारक राहील.

शिक्षकांच्या सभा-संमेलने शिक्षण परिषदा शक्यतोवर ऑनलाइन घ्याव्यात. ऑफलाईन स्वरुपात किंवा एकत्रित गर्दी जमा होईल अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम, सभा, संमेलने, परिषदा घेण्यात येऊ नयेत.

विद्यार्थ्यांचे परिपाठ, प्रार्थना एकत्रित स्वरूपात शालेय आवारात न घेता वर्गातच शारीरिक अंतर राखून घ्याव्यात

नगरपालिका, नगरपरिषद तसेच महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा दर जास्त असल्याने तेथे तूर्तास पहिली ते अकरावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार नाहीत. मात्र या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग पूर्णपणे सुरू राहतील. यासाठी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून अभ्यासक्रम पूर्ण करावा. तर, दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या कामासाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवता येईल.

नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिका क्षेत्रामधील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय झाल्यास प्रशासनातर्फे यथावकाश जाहीर करण्यात येईल.

उपरोक्त आदेश सर्वमाध्यमाच्या व्यवस्थापनांसाठी लागू राहणार असून याचे उल्लंघन करणार्‍या शाळा आणि संस्थाविरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

या परिपत्रकावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जन्माला आलेल्या बाळाचा चेहरा पाहण्याआधीच मातेचा मृत्यू, जळगावातील घटना

Next Post

गळा चिरून वृद्ध दाम्पत्याची हत्या

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
गळा चिरून वृद्ध दाम्पत्याची हत्या

गळा चिरून वृद्ध दाम्पत्याची हत्या

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us