बुलढाणा : सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी होत असलेल्या जाचाला कंटाळून नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील कठोरा येथे घडलीय. या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेत असल्याचा एक सेल्फी सुद्धा क्लिक केल्याचं समोर आलं आहे. सेल्फी क्लिक करुन आत्महत्या केल्याच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
बुलडाण्यातील कठोरा येथे 20 वर्षीय विवाहितेने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विवाहितेने आत्महत्येपूर्वी गळ्यात फास अडकवून सेल्फी काढला होता. हा सेल्फी तिने आपल्या नातेवाईकांना पाठवून गळफास घेतला असं बोललं जात आहे.
हे सुद्धा वाचा…
8 वी ते ग्रॅज्युएशन पाससाठी बंपर नोकऱ्या, लवकर अर्ज करा, शेवटची तारीख जवळच
मध्य रेल्वेत 2422 जागांसाठी बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी
परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याचा गोल्डन चांन्स, या विभागात भरती
जेवण बनवता येत नाही आणि केलं तर खूपच जास्त करत असते असे सासरच्या मंडळींकडून वारंवार बोलून हिणवलं जात होतं. इतकेच नाही तर हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोपही मृतक महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. प्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिच्या सासरच्या मंडळीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जलंब पोलीस अधिक तपास करत आहेत.