पाचोरा -(प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून आजपासून नामांकन अर्ज विक्री सुरु झाली आहे. सर्वच उमेदवार मोर्चे बांधणी करीत आहे. तर अजूनही पक्षांतर मोठया प्रमाणात सुरु आहे. आजही पाचोरा येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांचे नेतृत्व स्वीकारत असंख्य राष्ट्रवादी पक्षाच्या कारकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश घेत राष्ट्रवादीला खिंडार पाडली आहे.
यांनी घेतला प्रवेश– माजी नगरसेवक अयुब बागवान,सै. गफ्फार सै. गयास, शकील पिंजारी, रऊफ शहा, हनीफ खाटीक, मुनाफ काळू बागवान, अजीज बिस्मिल्ला शेख,इब्राहिम पटेल, सै. रईस, अकबर शेख जुम्मा, शकील इब्राहिम बागवान,शेख बाबुलाल शेख नूर, हारून बागवान,युसूफ कालू बागवान, फारूक नबी पिंजारी, फकिरा भाई, फारूक सलाम बागवान, अकील शेख कलंदर, सलीम बागवान, रेहान बागवान, जावेद मेहबूब बागवान, कलीम बागवान, खलील पानवाले, जमील बागवान, रज्जाक पिंजारी, सै. फिरोज, शकील कादर, रऊफ पिंजारी.