जळगाव । चारीत्र्यावर संशय घेऊन पत्नीवर चाकूहल्ला करुन खून केल्याप्रकरणी पतीस न्यायालयाने जन्मठेसह १० हजार रुपये दंडाची शिक्षा गुरूवारी ठोठावली. अनिल चावदस सपकाळे (वय ३३, रा.शिक्षक कॉलनी, जामनेर) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत असे की, जामनेर शहरात सतत पत्नीवर चारीत्र्याचा संशयावरून अनिल सपकाळे याने ३ फेब्रुवारी २०१९ रोजी घराजवळील बोळीत पत्नी मनिषावर चाकूहल्ला केला. डोक्यात वार केल्यामुळे पत्नी मनिषा सपकाळे गंभीर जखमी झाली होती. तर अनिल घटनास्थळावरुन बेपत्ता झाला होता. दरम्यान, उपचार सुरू असताना चार फेब्रुवारी रोजी मनिषाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मनिषाची आई प्रभाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जामनेर पोलिस ठाण्यात अनिलच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी त्याला अटक केली.
तत्कालिन पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. त्यामुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली.