जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची कन्या तथा जिल्हा सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ हल्ला करण्यात आला आहे. आज रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. राजकीय डावपेचांतूनच हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात शिवसेना आमदारा चंद्रकांत पाटील व खडसे यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत.
रोहिणी खडसे-खेवलकर चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम अटोपून कोथळी, मुक्ताईनगर येथे येत असतांना सुतगिरणी जवळ अज्ञात लोकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. रोहिणी खडसें यांना दुखापत झाली नसून कारवर रॉडने काचा फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, रोहिणी खडसे या जिल्हा बॅंकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका आहे