जळगाव – यावल व साकेगावला आज दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून घाम काढणाऱ्या उष्णतेतून आज यावल व साकेगावकरांना थोडासा दिलासा मिळाला. हवामान खात्यानेही विदर्भात केव्हाही अवकाळी पाऊस येऊ शकतो असा अंदाज वर्तवला होता. दुपारनंतर जळगाव जिल्यातील वातावरण अचानक बदलले. हवेत गारवा निर्माण झाला. दुपार नंतर प्रचंड वेगाने वारे वाहू लागले आणि पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. जळगावातही दुपारी ३ वाजेपासुन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तसेच या अगोदर चिनावल परिसरात वादळी पाऊस झाला होता.