- पाचोरा – भडगाव मतदार संघात राष्ट्रवादीला खिंडार
- गेल्या ३० वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे खंदे समर्थक शिवसेनेत दाखल
- निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत कारकर्त्यांचे इनकमिंग जोरात
पाचोरा :- अंतुर्ली खुर्द ता.पाचोरा येथील माजी सरपंच निंबा मोतीराम पाटील, सरपंच सौ.कविता कारभारी पाटील, वि.का.सोसायटी चे संचालक भगवान दामू पाटील, शौकत खान नजे खान, यांचे असंख्य राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यानी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदार संघात केलेल्या विक्रमी विकासकामांना पाहून, त्यांची जिद्द,चिकाटी, शेतकऱ्यासाठीची तळमळ पाहून गेले ३० वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त्यानी आज दि.२४/०९/२०१९ रोजी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला.
आज आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अंतुर्ली खुर्द येथे मंदिरात जाऊन विधिवत पूजा करून प्रचारास सुरुवात केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा विकास सोसायटी संचालक गणेश पाटील, ऍड.दिनकर देवरे, युवासेनेचे पप्पू राजपूत, अंतुर्ली गावातील शिवसेना पदाधिकारी, व लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.